Atal Bamboo Samruddhi Yojana Application बांबू लागवडीसाठी मिळत आहे, अडीच एकराला सात लाख अनुदान
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शासनाने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना करत असते. यामध्ये पीएम किसान योजना असो किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन नेहमीच प्रयत्न असते.
बांबू लागवड आता शासन यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. आज आपण बांबू लागवड अनुदान विषयी या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत ते काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की वाचा.
बांबू लागवड अनुदान
बांबू लागवडीसाठी महसूल विभागांना प्रोत्साहन दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीसाठी आता महसूल विभाग शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.
रोजगार हमी योजना
ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी योजना यांच्या माध्यमातून तेथील नागरिकांना रोजगार निर्मिती केली जाते . याचाच उपयोग करून बांबू लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून रोपे दिली जाणार आहे. रोपे मिळाल्यानंतर त्यांची लागवड करण्यासाठी लाभार्थ्यास तीन वर्षासाठी हे अनुदान दिले जाते. जर तीन वर्षाच्या अनुदान पाहिले तर ते अनुदान 6 लाख 90 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला रोप व लागवड करण्यासाठी मजुरीसाठी तीन वर्ष असे सहा लाख 90 हजार रुपये म्हणजेच सात लाख रुपये भेटणार आहे.
बांबू लागवडीसाठी अर्ज कोठे करणार?
बांबू लागवडीसाठी साधारणपणे सात लाख रुपये अनुदान मिळत आहे. बांबू लागवडीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर यासाठी आपल्याला वैयक्तिक किंवा शासकीय जमिनीवर आपल्याला बांबू लागवड करण्यासाठी अनुदान मिळते. हे अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला रोजगार हमी योजनेतून अर्ज करावा लागणार आहे.
बांबू लागवड अनुदान कसे जमा होते?
लाभार्थ्यांनी जर आपला अर्ज केला व तो पात्र ठरल्यानंतर तीन वर्षापर्यंत सहा लाख दहा हजार रुपये अनुदान एक आहे मजुरांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
नेमकी बांबू लागवड योजना काय आहे?
अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडून अनुदानावर आपण बांबू लागवड करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीवर बांबू लागवड करून त्यामधून उत्तम उत्पन्न घेऊ शकतो.
बांबू लागवड योजनेचे निकष काय आहे?
बांबू लागवड योजनेसाठी आपल्याला पुढील प्रकारे म्हणजेच कागदपत्र सादर करायचे आहे ते पुढील प्रमाणे
- विहित नमुना अर्ज
- आधार कार्ड
- शेतकऱ्या असल्यास सातबारा आठ अ उतारा
- बँक पासबुकची झेरॉक्स