ashadhi ekadashi 2024 आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी आता दिंड्यांना वीस हजार रुपयांचे अनुदान
पंढरपूर आषाढी वारीत हजारोच्या संख्येने वारकऱ्यांच्या दिंड्यांना शासनाच्या माध्यमातून 20 हजार रुपयांच्या अनुदान दिले जाणार आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला .आषाढी वारीसाठी ही विशेष बैठक घेण्यात आली .आषाढी वारीतील सर्व दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती .त्या संदर्भात या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला.
वारकऱ्यांसाठी गट विमा योजना तसेच वारकऱ्यांना त्यांच्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले . त्याचप्रमाणे भाविकांना दर्शन रांगेमध्ये लिंबू पाणी तसेच एक लिटर पाण्याची बाटली देण्याचे आहे सूचना यावेळी करण्यात आल्या