Animal Food subsidy – नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण पशुखाद्य अनुदान संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत पशुखाद्य अनुदान वाटप केले जाते या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे जनावरांना पोषक खाद्य उपलब्ध व्हावे व त्यांच्या संवर्धन व्हावे असा आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळील पशुवैद्यकीय दवाखाना येथे अर्ज उपलब्ध असतील किंवा अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे. अर्जंट सादर करण्यासाठी साधारणतः कालावधी हा नोव्हेंबर महिन्यातील एक तारखेपासून 30 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत आपल्याला अर्ज सादर करायचा आहे.Animal Food subsidy
अनुदानासाठी पात्रता काय असेल ?Animal Food subsidy
पशुखाद्य अनुदान घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
अर्जदार व्यक्तीची आपत्य दोन पेक्षा जास्त असल्यास अर्जदार अपात्र ठरल.
प्रति लाभार्थी पशुखाद्य शंभर टक्के किंवा जास्तीत जास्त दोन दुखत्या जनावरांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे.
शेतीसाठी काटेरी कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा
अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडावी.(Animal Food subsidy)
- ओळखपत्र आधार कार्ड
- रहिवासी पुरावा आधार कार्ड किंवा तलाठी यांचा रहिवासी दाखला
- अर्जदाराचा स्वतःचा जातीचा दाखला (सक्षम प्राधिकार्याचा)
- अर्जदार दारिद्र रेषेखाली असल्यास सक्षम प्राधिकार्यांचा दाखला अपत्य संख्या प्रतिज्ञापत्र
- अपंग असल्याचा अपंग प्रमाणपत्र
- रेशन कार्ड.
पशुखाद्य वाटप योजना २०२३-२४ अर्जाचा नमूना. (1)
योजनेचे स्वरूप व नियम पुढीलप्रमाणे
- प्रति लाभार्थी पशुखाद्य खरेदीसाठी अनुदान (१०० टक्के व रु. २४७२/- प्रती जनावर, जास्तीत जास्त २ दुभत्या जनावरांच्या मर्यादेपर्यंत).
- एका कुटुंबातील फक्त एकाच लाभयार्थ्यांला लाभ देण्यात येईल.
- पशुपालकाकडे 1 ते २ दुभत्या जनावरांचे पशुधन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला (सक्षम प्राधिकान्याचा) असणे आवश्यक आहे.
- फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील पशुपालक अर्जदारांना लाभ घेता येईल.
- अर्जदारास दि. १ मे २००१ नंतरच्या अपत्यासह एकूण अपत्य संख्या २ पेक्षा जास्त झाल्यास अर्जदार अपात्र होईल.
- प्राप्त अर्ज संख्या आर्थिक तरतूदीच्या तुलनेत जास्त झाल्यास दैव चिठ्ठी (Lucky Draw) पद्धतीने पात्र लाभाथ्यांमधून निवडण्यात येईल.