अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकिया A टू Z माहिती

WhatsApp Group Join Now

यंदा राज्यामध्ये पहिल्यांदाच इयत्ता 11वीचे प्रवेश online प्रकिया पद्धतीने होणार असल्याने 10 वी च्या विद्यार्थी कुठे नाही जाता आता घरबसल्या 11 वी प्रवेश अर्ज करता येणार आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊन तो भरून त्याच्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करावा लागत.त्यानंतर गुणवत्ता यादी नुसार प्रवेश दिले जात.

मोठ्या शहरात मात्र 11 वी प्रवेश प्रकिया ऑनलाईन स्वरूपात होती.मात्र यंदा पूर्ण राज्यात ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवली जाणार आहे.

अकरावी प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट जाण्यासाठी इथे क्लिक करा

अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी आहे?

अकरावी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अधिकृत वेबसाईट लॉगिन झाल्यावर आपला आसन क्रमांक टाकल्यास तेथे विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती आपोआप दिसेल.ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी मोबाईल एप्लिकेशन्स सुद्धा असणार आहे.
अर्ज भरण्यासाठी आपणास दोन भाग दिले असून त्यामध्ये एका भागात वैयक्तिक माहिती व भाग दोन मध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडायचे आहे.

अकरावी प्रवेश प्रकिया आवश्यक कागदपत्रे?

  • दहावीचे परीक्षेचे मूळ गुणपत्रक
  • दहावी शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • दोन फोटो
  • सामाजिक आरक्षणातून प्रवेश असेल तर जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखला

अकरावी साठी ऑनलाइन शुल्क किती असेल?


सर्व माहिती व कागदोपत्र अपलोड केल्यानंतर आपणास ऑनलाईन प्रवेश शुल्क भरायचे आहे.यासाठी आमच्या माहितीनुसार 100/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

अकरावी प्रवेश अर्ज भरण्यास कधी सुरुवात होईल?


अकरावी प्रवेश अर्ज भरण्यास १९ मे पासून सुरुवात होणार आहे.

Also Read  Bhu-Aadhar land adhaar card आता तुमच्या जमिनीचे बनणार आधार कार्ड जाणून घ्या काय आहे जमिनी बद्दल नवीन नियम

विद्यार्थ्यांनो या बाबी महत्त्वपूर्ण


1   .शासनाच्या अधिकृत पोर्टल अर्ज भरा.जागा भरताना राखीव जागा यांचा विचार करा.

  1. ऑनलाईन प्रवेश प्रकिया ही पारदर्शक पद्धती होणार आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
  2. प्रवेश अर्ज करताना परिपूर्ण माहिती भरा.सुरुवातीला कच्ची माहिती गोळा करा आणि फायनल झाल्यावर आपला ऑनलाईन अर्ज भरा.
  3. अर्जाच्या भाग दोन मध्ये महाविद्यालय निवड करताना योग्य पसंतीक्रमांक द्या.अर्ज भरून झाल्यावर सबमिट करा.
  4. खुल्या प्रवर्गासाठी 55 टक्के जागा तर 45 टक्के जागा सर्व जात संवर्ग मिळतील.

Leave a Comment