pm kisan drone yojana 2024 शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करा आणि केवळ आठ मिनिटात एक एकरावर फवारणी करा या योजनेतून मिळत आहे चार लाख रुपये

WhatsApp Group Join Now

सध्या शेती क्षेत्रामध्ये अत्याधुनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला. त्याचप्रमाणे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वीपणे होत आहे . तंत्रज्ञानाच्या या युगामुळे शेतकऱ्यांना अनेक पायाभूत सुविधा आता उपलब्ध होत आहे. केंद्र शासन व  महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आखत असते. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादन वाढण्यास व शेती फायदेशीर होणे सुद्धा मदत होत आहे.

शेती करत असताना शेतीवर अनेक प्रकारचे किड पडत असते त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही कीड घालवण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात. कीटकनाशका फवारणी करत असताना ती पाठीवर पंप व बॅटरीवर ऑटोमॅटिक फवारणीच्या माध्यमातून सुद्धा फवारणी करत असतात. मात्र यामध्ये वीस लिटरचा पंप यामुळे बराच वेळ शेतकऱ्यांचा जातो आणि यामुळे कधी कधी कीड सुद्धा लवकर आटोक्यात येत नाही . यावर उपाय म्हणजे पिकावरील फवारणी कमी वेळात व झटपट होण्यासाठी ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करता येते. मात्र ड्रोन खरेदी करणे हे जास्त किमतीमुळे शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर आहे. मात्र आता हे सुद्धा ड्रोन खरेदी करणे सोपे होणार आहे.

ड्रोन खरेदी करणे झाले सोपे. pm kisan drone yojana 2024

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असता शेतीमध्ये खूप सुधारणा करता येत आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर ही संकल्पना सध्या वाढत जाताना दिसत आहे. मात्र हा ड्रोन ची किंमत जास्त असते ; यामुळे त्याची खरेदी करताना शेतकरी बराच वेळा विचार करतो.

केंद्र शासनाच्या वतीने किसान ड्रोन योजना 2024 pm kisan drone yojana 2024 सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरातील विविध भागातील शेतकऱ्यांना व महिलांना शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीवर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनुदान रूपाने सवलत देण्यात येत आहे.

Also Read  Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) काय आहे सरकारची मातृत्व वंदना योजना? गरोदर महिलांना मिळतात 6000 रुपये

ड्रोनच्या माध्यमातून फक्त आपल्याला फवारणीचे काम करता येतात असे नाही तर त्याच्या साह्याने आपण जमिनीची नोंदी , नकाशे, पिकाचे मूल्य , पोषक द्रव्य यासारखी बरीच काम करू शकतात. ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्याचे कष्ट तर वाचतात आणि पैसेही वाचतात.

ड्रोन योजनेमुळे होणारे फायदे pm kisan drone yojana 2024

ड्रोनच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आता कमी वेळात जास्त जमीन फवारणी होणार आहे . कीटनाशके  फवारणीमुळे होणारी विषबाधा सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे . ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही एक एकर क्षेत्र अवघे सात मिनिटांमध्ये सुद्धा पूर्ण करू शकतात.

ड्रोनचे माध्यमातून फवारणी केल्यानंतर आपल्याला लागणारे खते आणि औषधे याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला वारंवार टॅंक भरण्यासारखी समस्या सुद्धा येणार नाही. त्यामुळे पाण्याची सुद्धा बचत होईल व शेतीचा खर्च सुद्धा कमी झालेला दिसून येणार आहे.

प्रशिक्षण सुद्धा शेतकऱ्यांना देणार असून हे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे

ड्रोन प्रशिक्षणाच्या माध्यमातून ह्या ट्रेनिंग मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज भासणार नाही. कारण शासनाच्या माध्यमातून हे सर्व ट्रेनिंग मोफत असणार आहे.

ड्रोन योजनेमुळे पिकांचे मूल्य आपण त्याचप्रमाणे जमिनीच्या डिजिटल नोंदी आणि कीटकनाशकांची फवारणी यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना चालना मिळणार आहे.

ड्रोन खरेदी करण्यासाठी किती अनुदान प्राप्त होणार?

ड्रोन किसान योजना या योजनेमध्ये ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते . ड्रोन खरेदी अनुदानामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच महिला वर्ग आणि ईशान्य कडे राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी एकूण किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाते.

तर इतर भागातील शेतकऱ्यांना 40% किंवा जास्तीत जास्त चार लाख रुपये पर्यंत अनुदान मिळते . यामध्ये फार्मर प्रोडूसर कंपन्यांना 75 टक्के सबसिडी मिळते शेतकऱ्यांना त्यांना वैयक्तिक शेतकरी व्यतिरिक्त मान्यताप्राप्त कृषी प्रशिक्षण संस्था किंवा कृषी विज्ञान केंद्रांना द्रोण खरेदी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान प्राप्त होते.

Also Read  तुमचं आधार, पॅन कार्ड आहे? पण तुम्ही भारतीय आहात याचा पुरावा आहे का?" – सरकारचा मोठा खुलासा!

ड्रोन योजनेसाठी कुठे करायला अर्ज

शेतकऱ्यांना किसान ड्रोन योजनेचा अनुदान घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा तुमच्या जवळच्या तहसीलमधील कृषी विभागात या कार्यालयात जाऊन या संदर्भातील योजनांचा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.pm kisan drone yojana 2024

ड्रोन योजना साठी लागणारी विविध कागदपत्र

या योजनेमध्ये पुढील प्रमाणे कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे. pm kisan drone yojana 2024

आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते , जमिनीचे सातबारा उतारा ,आठ अ उतारे इत्यादी.

Leave a Comment