e-peek pahani online registration खरीप हंगामासाठी पाहणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात ; आपल्या मोबाईल वरून करा आपल्या पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या खरीप हंगाम सुरू आहे व राज्यामध्ये सर्वत्र समाधानातकारक पाऊस झाला आहे. सातबारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी यापूर्वी शासनाने ई-पीक पाहणी अँप्स आणले होते . यामध्ये आपल्या शेतामध्ये असलेल्या पिकाची नोंद आपण आपल्या सातबारावर करू शकतो. गेल्या दोन वर्षापासून राज्यभरामध्ये या आजच्या साह्याने शेतकरी आपल्या पिकाचे नोंद करत आहे . गेल्या वर्षापासून केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्वे हे ॲपचा काही तालुक्यांमध्ये सुद्धा वापर करण्यात आलेला आहे.

चालू खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲपचा पूर्ण राज्यात वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे जशा सूचना मिळणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला एक ऑगस्ट पासून आपल्या पिकाची नोंद सातबारावर करण्यासाठी वापर करायचा आहे.

E-Peek Pahani अँप वर पिक नोंदणी कशी करावी

  • प्ले स्टोअरवर ना आपल्याला ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाची नोंद करायची आहे.
  • हे नोंद करत असताना आपल्याला एक ऑगस्ट पासून नोंदीला सुरुवात करायची आहे.
  • आपल्या शेतामध्ये पीक आहे ते शेतामध्ये जाऊन 50 मीटरच्या आत जाऊन आपण फोटो काढावा लागतो तरच त्या पिकाची नोंद होते.
  • ग्रामस्थारावरील तलाठी कोतवाल कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांचे साह्याने सुद्धा पीक पाहणी केली जाणार आहे.

Also Read  pradhanmantri ujjwala yojana 2024 प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि तो कसा घेता येईल?

Leave a Comment