ladki bahin yojana maharashtra bank Account बँकेत खाते नसलेल्या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू असून यामध्ये अनेक महिला भगिनी अर्ज दाखल करत आहे .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आली तर आज या लेखांमध्ये आपण या सहा निर्णयाविषयी माहिती पाहणार आहोत तर हा लेख नक्की काळजीपूर्वक वाचा. ladki bahin yojana maharashtra bank Account
लाडके बहीण योजनेसाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले तर काही जुन्या नेमणुच्या अटी आणि शर्ती मध्ये शिथिलता आणण्यात आले आहे. राज्य शासनाने या योजनेची घोषणा केल्यापासून राज्यभरामध्ये या योजनेमध्ये उत्तम आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला भगिनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत आहे . राज्य शासनाने नेमकं हे लक्षात घेऊन या योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग कसा वाढेल. त्यांना लाभ कसा मिळेल याचा विचार करून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ते पुढील प्रमाणे;
पोस्टातील बचत खाते ही ग्राह्य धरले जाणार, ladki bahin yojana maharashtra bank Account
ज्या महिलांचे खाते नाही त्या महिलांना आपले खाते कुठे उघडावे हा प्रश्न पडला होता . कारण ग्रामीण भागामध्ये ज्याप्रमाणे बँक आहेत. त्याप्रमाणे तिथं बँकांमध्ये खाते उघडणे अवघड आहे. मग या योजनेचे पैसे कुठे जमा होईल . हा पण प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे ज्या महिलांचे बँकेत खाते नाही .त्यांच्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्णय घेतला असून अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टमध्ये खाते काढले ते खाते ग्राह्य धरले जाणार आहे . त्यावर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत किंवा पोस्टमध्ये खाते असणे अत्यंत आवश्यक आहे तरच शासन पैसे जमा करणार आहे.
लाडक्या बहिणीला पहिला हप्ता कधी मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पहिला हप्ता हा साधारणपणे एक जुलैपासूनच सुरू होणार असून राज्य शासनाने कागदपत्रांमध्ये शिथिलता आल्यामुळे अनेकांना यांचा फायदा व लाभ मिळणार आहे . साधारणपणे 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्याचा शासन प्रयत्न करत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना रक्षाबंधन निमित्त ही भेट देण्याचा राज्य शासन विचार करत आहे . जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची म्हणून 3 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्याची राज्य शासन विचार करत आहे.
या योजनेमध्ये कोणत्या महिला अपात्र ठरणार आहे
- ज्या कुटुंबातील उत्पन्न हे अडीच लाखाच्या पुढे आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
- ज्या कुटुंबामध्ये आयकर भरला जातो किंवा ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही.
- संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना अंतर्गत 1500 पेक्षा जास्त अनुदान घेत असणाऱ्या महिलांना लाडके बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही अशा महिलांनी अर्ज करू नये असे आव्हान शासनामार्फत करण्यात येत आहे.
लाडके बहिणी योजनेचे कोण आहेत पात्र
- लाडकी बहिणी योजनेमध्ये महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार त्याचप्रमाणे नंतर अविवाहित महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे .
- या योजनेची वयाची अट 21 ते 65 वर्षे इतकी ठेवण्यात आलेले आहे.
- लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे किंवा पोस्टमध्ये खाते असणे आवश्यक आहे .
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पर्यंत असणे आवश्यक आहे.