WhatsApp Group
Join Now
नमस्कार शेतकरी आणि भगिनींनो राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आता लाडक्या भावांसाठी Ladka Bhau Yojana 2024 सुद्धा नवीन योजना आणल्या असून लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय . या Ladka Bhau Yojana 2024 योजनेमध्ये दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन वेतन दिले जाणार आहे चला तर आज या योजनेचे माहिती पाहूया.
लाडका भाऊ योजना स्वरूप Ladka Bhau Yojana 2024
- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योगता नाविनता विवाह आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमा अंतर्गत वेबसाईटच्या माध्यमातून रोजगार इच्छुक असणारे उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडले जाणार आहे.
- यामध्ये वेबसाईटवर इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी करणे त्यानंतर जागांची नोंदणी प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदणी विद्या वेतन आदा करणे ,प्रशिक्षण आणि समाप्ती अहवाल इत्यादी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध केली जाणार आहे. Ladka Bhau Yojana 2024
- बारावी ,आयटीआय, पदविका ,पदवी , पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले विद्यार्थी सुद्धा याच ठिकाणी नोंदणी करू शकतात.
- ज्या व्यवसायिकांना मनुष्यबळाची मागणी आहे लघु आणि मध्यम व मोठे उद्योग , सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना त्याच्या सहभागी होऊ शकतात.
लाडका भाऊ योजना उमेदवार पात्रता Ladka Bhau Yojana 2024
- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
- उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बारावी पास ,आयटीआय, पदवी, पदव्युत्तर असावा. शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाही.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा आधीवासी असावा.
- उमेदवाराची आधार नोंदणी असावी .
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे .
- उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योगता आयुक्तालयाच्या संकेतावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
लाडका भाऊ योजना कार्य प्रशिक्षण कार्यक्रम कसा असणार? Ladka Bhau Yojana 2024
- या योजनेमध्ये उमेदवारांना सहभागी होण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे.
- अनुभवी रोजगार इच्छुक पात्र झाल्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत कुशल किंवा अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.
- सदर कार्य प्रशिक्षण हे सहा महिन्याचं असणार आहे आणि या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेच्या माध्यमातून शासनामार्फत विद्यावेतन दिले जाणार आहे.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या आस्थापनाकडनं त्यांना प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सांगितलेल्या नमुन्यामध्ये प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- या कालावधीमध्ये जर संबंधित उमेदवाराची चुकता किंवा योग्य असल्यास त्या उमेदवाराला रोजगार देण्याचे दृष्टीने संबंधित आस्थापना म्हणजे कंपनी निर्णय घेऊ शकते.
- या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षण घेत आहे त्या उमेदवारांना किमान वेतन कायदा ,राज्य कामगार विमा कायदा , कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा , कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाह कायदा लागू राहणार नाही.
Ladka Bhau Yojana 2024 शासन निर्णय व ऑनलाइन नोंदणी इथे क्लिक करा .
लाडका भाऊ योजना दरमहा किती मिळणार ? Ladka Bhau Yojana 2024
अ.क्रमांक | . शैक्षणिक पात्रता | प्रतिमाह विद्यावेतन |
1 | 12 वी पास | 6000 |
2 | आय . टी. आय . / पदविका | 8000 |
3 | पदव्युत्तर / पदवीधर | 10000 |
तर अशाप्रकारे जर आपण पूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलं तर आपल्या दरमहा सहा हजार ते दहा हजार रुपये आपल्याला प्राप्त होणार आहे हे विद्यावेतन आपल्या आधार लिंक असलेल्या खात्यावर वर्ग केले आहे आणि त्यानुसार त्यांना ते प्राप्त होणार आहे या योजनेचा लाभ हा फक्त एकदाच घेता येणार आहे तर अशा प्रकारे लाडका भाऊ योजना Ladka Bhau Yojana 2024 ही सुरू करण्यात आली आहे म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय.