ladki bahini yojana online list maharashtra लाडकी बहीण योजनेचा आपला अर्ज होईल का पात्र ? दोन याद्या का लावल्या जाणार जाणून घ्या कारण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज महिला भगिनी करत आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. अर्ज सादर करण्यासाठी तीन प्रकारे आपण अर्ज सादर करू शकतो यामध्ये नारीशक्ती ॲपचा वापर करून, अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन आणि सेतू केंद्रामध्ये ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतात.
मात्र यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे लागणारी जी कागदपत्र आहेत तरच आपल्याला अर्ज सादर करता येत आहे.
तात्पुरती यादी म्हणजे काय?
सध्या हजारोच्या संख्येने महिला भगिनी आपले अर्ज ऑनलाईन ऑफलाइन सादर करत आहे . शासनाकडे महिलांचे प्राप्त झालेले अर्ज दोन प्रकारच्या याद्या मध्ये प्रसिद्ध केले जाणार आहे. या संदर्भामध्ये शासन निर्णय 28 जून मध्ये नमूद केलेले आहे यानुसार शासन निर्णय महिलांचे अर्ज मिळाल्यानंतर एक तात्पुरती यादी जाहीर केली जाणार आहे. या तात्पुरत्या यादीची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत आणि शहरांमध्ये वार्डस्तरावर सूचना फलकावर सुद्धा लावली जाणार आहे . त्याचप्रमाणे ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टल तयार होईल त्या ठिकाणी सुद्धा ही यादी आपल्याला पाहता येणार आहे.
तात्पुरत्या यादीचा नेमका अर्थ
तात्पुरती यादी ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यावेळी हरकती असेल तर ती पोर्टल अथवा ॲपच्या सहाय्याने किंवा ऑफलाइन करायचा असेल तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आणि सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आपल्याला लेखी हरकत किंवा तक्रार करता येणार आहे . यासाठी एक रजिस्टर केले जाईल त्याच्यामध्ये नोंदी घेतले जाईल आणि ऑनलाईन अपलोड केल्या जाते.
पात्र लाभार्थी महिलांची यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदणी आवश्यक आहे . त्यानंतर नोंदवलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे.
दुसरी अंतिम यादी
आलेल्या तक्रारी व हरकती यांची निवारण केल्यानंतर पात्र लाभार्थी यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल आणि यामध्ये पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी आपल्याला अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत आणि वाढ स्तरावर तसेच सेतू सुविधा केंद्रात आणि जर पोर्टल तयार झाले तर पोर्टलवर आणि ॲपवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपला अर्ज सादर करताना अत्यंत काळजीपूर्वक सादर करावा जेणेकरून अपात्र ठरण्याची शक्यता राहणार नाही.