e rickshaw yojana maharashtra समाज कल्याणची विभागाची जबरदस्त योजना झेरॉक्स मशीन सायकल आणि भरपूर
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभाच्या विविध योजना आल्या असून आज आपण या योजनांविषयी माहिती पाहणार आहोत.
राज्याच्या विविध जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना यंदा झेरॉक्स मशीन कडबा कुट्टी रिक्षा पाच एचपी कृषी पंप, शेळी गट , दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकल मिळणार आहे तर दहावीतील विद्यार्थ्यांसाठी टॅली आणि आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत एमएस-सीआयटी चे संधी सुद्धा मिळणार आहे . यासाठी अर्ज मागविले जात असून हे अर्ज ग्रामपंचायत कडून पंचायत समितीला येणे अपेक्षित आहे. साधारणता सोलापूर जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत या विविध योजना आल्यास आपल्याही जिल्ह्यातल्या योजना आल्या असतील तर ग्रामपंचायत संपर्क साधून योजना चा लाभ घ्या.
सोलापूर जिल्ह्यातील 20 टक्के मागासवर्गीय तर 5% दिव्यांग लाभार्थ्यांना यांना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध साहित्य योजनांचा लाभ दिला जाणार आहे . साधारणपणे एस.सी ,एस.टी कानी आणि व्हीजेइनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाचा लाभ दिला जातो.
एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्याची या योजनेचे लाभ घेऊ शकतात व अर्ज करू शकतात विद्यार्थ्यांसाठी अर्ज करताना ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे.
दिव्यांग यांना पहिल्यांदाच रिक्षा दिल्या जाणार आहे यासाठी 60 लाख रुपये बजेट ठेवले असून यासाठी 40 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आणि वार्षिक एक लाख रुपये उत्पन्नाचे तरच लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व व्हीजेइनटी या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ज्यांचे उत्पन्न एक लाखापर्यंत आहे . अशांना चार शेळ्या व एक बोकड यांचा समावेश असलेला गट दिला जाणार आहे यासाठी 42 हजार रुपये दिले जाणार आहे त्याचप्रमाणे शेती पूरक अशी सुद्धा अवजारे दिले जाणार आहे.