atal pension yojana increase to 10000 पेन्शन योजनेतून मिळणार , आता ५००० ऐवजी १०००० रुपये
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो केंद्र शासन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देशातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून वाढीव निधी तसेच योजनेची व्याप्ती वाढवली जाऊ शकते . आज आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत
सामाजिक सुरक्षा अंतर्गत येणाऱ्या विविध योजना यांची व्याप्ती ही वाढ करण्याची शक्यता चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते.
केंद्र शासनाच्या अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्याला दिले जाणारे पाच हजार रुपये इतके मासिक वेतन आता दहा हजार होऊ शकते . सध्या या योजनेमध्ये 7 कोटी खाते उघडले असून यामध्ये वाढ होत चालली आहे. खातेधारकांना एक ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाते.
नेमकी काय आहे अटल पेन्शन योजना?
या योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा म्हणून ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती . या योजनेमध्ये 18 ते 40 या वयोगटातील व्यक्तीने महिन्याला 42 ते 1455 रुपये प्रीमियम जमा करतात. या योजनेमध्ये आपल्याला आपल्या वयानुसार हा भरावा लागतो.
वयाच्या साठ वर्षानंतर त्या व्यक्तीला दरमहा 1000 ते ५००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते वाढत्या वयाबरोबर याचा हप्ता सुद्धा हा वाढत जातो सध्या या योजनेमध्ये देशभरामध्ये जवळपास सात कोटी लोकांनी आपली खाते काढले असून नियमितपणे ते प्रीमियम भरत आहे. atal pension yojana increase to 10000