subsidy agriculture machinery जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना मिळणार विविध अवजारे

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो जिल्हा परिषद सेज फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण व शेतीसाठी मशागतीची विविध अवजारे ही 50% मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहे आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत.

साधारणपणे सोलापूर जिल्हा परिषद सेस फंडामधून शेतकऱ्यांना ही अवजारे आता 50 टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहे तर आपल्या जवळील जिल्हा परिषद मध्ये आपण चौकशी करून या संदर्भ ही माहिती घेऊ शकता.

अर्ज कुठे सादर करायचे आहे

यासाठी शेतकऱ्यांनी आता 6 ऑगस्ट ही मुदत देण्यात आलेली आहे.  त्यामुळे पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर करण्याचे आव्हाने या ठिकाणी देण्यात आलेले आहे . या योजनेचा लाभ देण्यासाठी अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , अत्यल्प भूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्र subsidy agriculture machinery

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपणाला स्वतःचा सातबारा उतारा ,आठ अ उतारा , आधार कार्ड , बँक पासबुक झेरॉक्स लाभार्थी , जर अनुसूचित जाती जमाती असेल तर जातीचा दाखला , दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग दाखला झेरॉक्स प्रत संबंधित पंचायत समितीत आपल्याला सादर करायचा आहे. subsidy agriculture machinery

लाभार्थी शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडनं आपल्या पसंतीच्या अवजारे खरेदी करावी लागणार आहे. यासाठी अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बी आय एस अथवा प्रमाणात अनुसार तांत्रिक निकषानुसार असावी असेही जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना सुचित करण्यात आले आहे.

सेस फंडातून कोणती अवजारे मिळणार

शेतकऱ्यांसाठी प्रिस्टन्स स्प्रे पंप , नॅमसॅक बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप, ब्रश कटर, सोलर इन्सेक्ट ट्रॅक,  रोटा वेटर , पलटी नांगर,  रोटरी टेलर व विडर पेरणी यंत्र ,  कल्टीवेटर , 5 एचपी सबमरीन पंप, कडबा कुट्टी , ताडपत्री इत्यादी अनुदान 50 टक्के प्रमाणे दिले जाणार आहे

Also Read  तीन महिन्यांचं रेशन एकदम मिळणार राज्य शासनाचा मोठा निर्णय

Leave a Comment