one rupee crop insurance scheme शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात पिक विमा , पिक विमा भरण्यासाठी सुरुवात

WhatsApp Group Join Now

one rupee crop insurance scheme शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात पिक विमा , पिक विमा भरण्यासाठी सुरुवात

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 हा सुरू झाला आहे तर पिक विमा भरण्यासाठी भरण्यास सुरुवात झाली असून 18 जून पासून पिक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर शेतकऱ्यांना पिक विम्याची माहिती भरायची आहे

गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिकाचा विमा भरावा लागणार असून या संदर्भामध्ये राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे .पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही 15 जुलै पर्यंत असून यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरावा असेही यावेळी आवाहन करण्यात आले आहे.

पिक विमा योजनेमध्ये समावेशित पिके

पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 मध्ये भात, ज्वारी, सोयाबीन ,कापूस, तूर , मूग , उडीद , मका , बाजरी , नाचणी , भुईमूग , तीळ , कारले , कांदा या 14 पिकांचा समावेश करण्यात आला आहे

पुढील शेतकऱ्यांचाही होणार समावेश

अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही भाग घेता येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने यांचा समावेश या योजनेमध्ये होणार आहे.

पीक कर्ज घेणारे आणि बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभाग ऐच्छिक राहील.

भाडेपट्टीने शेती करणारे शेतकऱ्यांना पिक विमा वेबसाईटवर त्या संदर्भामध्ये नोंदणीकृत केलेला भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे.

 

ई-पाहणी आवश्यक

शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पाहणी मध्ये करणे आवश्यक असून तरच त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे ही पाहणी ॲपवर याची नोंद करणे आवश्यक आहे तरच विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

कागदपत्रे

पिक विमा भरत असताना आधार क्रमांक आवश्यक असून आधार क्रमांक वरील नावाप्रमाणेच अर्ज सादर करावा.

Also Read  एआयसीटीई प्रगती स्कॉलरशिप योजना: मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

पिक विमा संदर्भामध्ये पेमेंट करताना आपले बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे त्यामुळे अधिकृत अशा खात्यावरच हे पेमेंट जमा केले आहे त्यामुळे आधार वरील नाव आणि बँक खाते कार्ड वरील नाव हे सारखे असावे.

सातबारा उतारा

पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र

भाडेपट्ट्याने शेती करत असल्यास नोंदणीकृत भाडेकरार

याप्रमाणे आपल्याला 15 जुलै पर्यंत पिक विमा अर्ज सादर करायचा आहे लक्षात ठेवा आधार वरील नाव बँक खात्यावरील नाव व जी जी कागदपत्र आहे त्यावरचे नाव आहे सारखे असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळील सीएससी केंद्राच्या मदतीने आपला अर्ज पिक विमा पोर्टलवर भरू शकता ही मुदत 15 जुलै पर्यंत आहे. one rupee crop insurance scheme

Leave a Comment