xerox machine scheme maharashtra 2024 वैयक्तिक लाभाच्या योजणतून होणार मोठा फायदा
राज्यातील अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व दिव्यांग घटकांनी आपल्या योजना संबंधित परिपूर्ण असे प्रस्ताव 15 जुलै पर्यंत पाठवावे असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या उपक्रम अंतर्गत अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व दिव्यांग घटकांच्या विकासासाठी विविध योजना व वैयक्तिक दिला जातो .जिल्हा परिषदेच्या स्व: उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कम ही अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग व नव बौद्धांसाठी तर 5 टक्के रक्कम दिव्यांगांसाठी खर्च करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत परिपूर्ण प्रस्ताव आहे 15 जुलै पर्यंत संबंधित पंचायत समितीमध्ये सादर करावे असे आव्हान करण्यात येत आहे.
मागासवर्गीयांसाठी पुढील प्रमाणे योजना आणि अनुदान देण्यात येते
संगणक लॅपटॉप पुरवणे – 42 हजार रुपये
झेरॉक्स मशीन पुरवणे चार लाख तीस हजार 70 रुपये
महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे 4 लाख तीस हजार 70 रुपये
कडबा कुट्टी यंत्र 29 हजार रुपये
पिको फॉल मशीन पुरवणे 9300 रुपये
दुग्ध व्यवसायासाठी गाई म्हैस पुरवठा 40 हजार रुपये
मिरची कांडप यंत्र पुरवणे 20 हजार रुपये
शेळी गट पुरवणी 25000
आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये वरील प्रमाणे योजना सुरू असून या योजनेअंतर्गत आपल्याला परिपूर्ण असा प्रस्ताव करून सादर करायचा आहे. वरील योजनांचा अधिकृत माहिती आपल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मार्फत माहिती घेऊन त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावा.