krishi sakhi yojana 2024 देशभरातील 90 हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण

WhatsApp Group Join Now

krishi sakhi yojana 2024 देशभरातील 90 हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो केंद्र शासनाने कृषी संबंधित नवीन योजना आणली असून यामध्ये देशभरात 90000 महिलांना कृषी सखीचं ट्रेनिंग देण्याची घोषणा केंद्रीय कृषी विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे.

ग्रामीण भागातील महिलांना शेतातील विविध कामे आणि तंत्रज्ञान याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे . प्रशिक्षित महिला शेतातील शेती तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती यानुसार केंद्र सरकार त्यांना प्रशिक्षण देणारा असून एका वर्षामध्ये प्रशिक्षित महिला या सात ते 80 हजार रुपये कमवू शकतील असाही दावा त्यांनी या ठिकाणी केला आहे.

या योजनेअंतर्गत देशभरातील 12 राज्यांमध्ये कृषी सखी योजना कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे . यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये महिला अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतात त्यांना प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना सल्ला देण्याचे काम तर करू शकतात आणि त्या मोबदल्यामध्ये शेतकरी कृषी सखींना काही मोबदला दिला जाणार आहे.यामुळे कृषी विस्तार होऊन शेती ही व्यवसाय व व्यवहारिक होईल असाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

Also Read  kanda chal mahadbt कांदा चाळ योजना संपूर्ण माहिती 2024

Leave a Comment