7/12 update Alert mobile भूमि अभिलेख मोजणी संदर्भात अपडेट आता लगेच आपल्या मोबाईलवर

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी शेती संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे सातबारा किंवा मिळकत पत्रिका होय. भूमि अभिलेख संदर्भामध्ये शासनाने आता नवीन एक निर्णय घेतला आहे त्या निर्णयासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

जमिनी संदर्भामध्ये सातबारा उतारा मिळकत प्रमाणपत्र यामध्ये जर कोणतेही प्रकारची नवीन बदल आता जमीन मालकाला लगेच मिळणार आहे. यासाठी शासनाने नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल ची सुविधा लवकरच सुरू करून देणार आहे यामुळे जमिनी संदर्भामध्ये जर एखादी मोजणीची नोटीस आता आपल्याला आपल्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे.

भूमी अभिलेख विभाग हा नागरिकांसाठी विविध सुविधा या ऑनलाइन पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो . यातीलच काही भाग म्हणजे सातबारा उतारा याचे झालेले डिजिटलडायजेशन आपण पाहतच आहोत याशिवाय फेरफार उताऱ्यावर 100% नोंदी आता ऑनलाईन घेतल्या जात आहेत.

जमीन मोजणीच्या संदर्भामध्ये मोजणीची नोटीस अर्जदारांना आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी मोजणी version 2  हा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

यापूर्वीच्या काळामध्ये जमिनीच्या मालकी हक्क संदर्भामध्ये नागरिकांना काही माहिती हवी असेल तर त्यांना पोर्टलला जाऊन त्या संदर्भामध्ये वेळोवेळी ती पहावी लागत होते . मात्र नागरिकांना महाभुमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ही माहिती घेण्याची आवश्यकता टाळण्यासाठी आता नागरिकांना डायरेक्ट नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली. आहे त्यामुळे जमिनी संदर्भात मोजणी संदर्भामध्ये काही अडचण असेल तर ती आता तात्काळ आपल्याला मोबाईलवर उपलब्ध होणार आहे

Also Read  केंद्र शासनाने या खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केली नवीन नियमांची माहिती जाणून घ्या

Leave a Comment