नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शेती व्यवसाय जर फायदेशीर आणायचा असेल, तर शेती बरोबर आपल्याला त्याला जोडून शेतीसंबंधी जोडधंदा करायला हवा तर शेती व्यवसाय हा फायदा मध्ये होत असतो.
आज आपण पशु किसान क्रेडिट कार्ड विषयी माहिती पाहणार आहोत . पशु किसान क्रेडिट कार्ड वर तुम्हाला पशुपालन व्यवसाय करण्यासाठी लोन म्हणजेच कर्ज मिळते पशु किसान क्रेडिट कार्ड याच्यामधून आपल्याला साधारणता एक लाख 7 हजार रुपयापर्यंत कर्ज कोणतेही गॅरंटी शिवाय प्राप्त होते. याच कार्डवर आपण साधारणपणे तीन लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त कर्ज देऊ शकतो . याच्या माध्यमातून आपण पशुपालन व्यवसाय करताना गाई म्हैस इत्यादी व्यवसाय करू शकतो.
ज्याप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड काम करते त्याचप्रमाणे व पशु किसान क्रेडिट कार्ड हे काम करत असते. याच्या माध्यमातून आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज सहजपणे प्राप्त होत असते.
पशु किसान क्रेडिट कार्ड मुख्य उद्देश
पशु किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकरी हा सामान्यतः कुठून तरी शेतीसाठी पैसे घेतो . हे पैसे परत करताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . हे अडचणी त्याला येऊ नये यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड हे देण्यात आलेला आहे . त्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे त्याचप्रमाणे शेतीला जोडधंदा मिळावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी . यासाठी हे कार्ड निर्माण करण्यात आले यामध्ये तुम्हाला तीन लाखापर्यंतचे कर्ज सहजपणे मिळते तेही कोणतेही तारण ठेवण्याची आवाहयकता नाही.
पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पात्रता
पशु किसान क्रेडिट कार्ड हे सर्व शेतकरी बनू शकतात.
जे शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे . याच्यामध्ये कमी व्याजाने व सबसिडीचे कर्ज घ्यायचे आहे ते सर्व शेतकरी यामध्ये लाभ घेऊ शकतात.
जय श्रीराम शेतकऱ्यांकडे जमीन नाही ते सुद्धा म्हणजे भूमिहीन आहेत ते सुद्धा हे कार्ड बनू शकतात.
एकंदरी ज्यांना पशुपालन व्यवसाय करायचा आहे ते सर्व हे कार्ड तयार करू शकतात.
पशु किसान कार्ड वरील लोन ची मर्यादा
पशु किसान क्रेडिट कार्ड वर साधारणता आपल्याला 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनाकारण कर्ज प्राप्त होते . त्यावर आपल्याला कमी व्याज द्यावे लागते आणि जास्तीत जास्त जर आपल्याला 3 लाखापर्यंतचे कर्ज अगदी कमीत कमी व्याजाने मिळते. म्हणजेच जर शासनाने सबसिडी दिली तर ती तीन टक्के ते चार टक्के व्याजाने सुद्धा हे लोन प्राप्त होते.
या कार्डच्या सहाय्याने तुम्ही काय म्हैस शेळी मेंढी कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करू शकतात.
पशु किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे
आधार कार्ड ,पॅन कार्ड , रेशन कार्ड , बँक पासबुक , फोटो , पशु हेल्थ सर्टिफिकेट , पशु विमा इत्यादी कागदपत्रे
पशु किसान क्रेडिट कार्ड कुठे तयार कराल
साधारण पशु किसान क्रेडिट कार्ड हे मोठ्या बँकेमध्ये आपल्याला तयार करून मिळते साधारणपणे त्या बँकेची नावे पुढीलप्रमाणे
State Bank of India
HDFC BANK
Exis Bank
Bank Of Baroda
Icici Bank
Central Bank
म्हणजे साधारणतः राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपल्याला पशु किसान क्रेडिट कार्ड काढतील यामध्ये आपलं बँकेमध्ये आपले खाते असणे आवश्यक आहे किंवा ते आपण नंतर काढू शकतो.
कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा कराल
साधारणपणे आपण आपल्या जवळील बँक निवडून त्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती घेऊनच मग आपण अर्ज घ्यायचा आहे. त्याविषयी संबंधित माहिती भरून तो सबमिट करून त्याला आवश्यक ती कागदपत्र जोडून तो बँकेत जमा करायचा आहे.
यानंतर बँकेच्या नियमानुसार आपल्याला ते कार्ड प्राप्त होईल आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो.