जमीन मोजणीची नोटीस पाहायला मिळणार ही ‘ई-चावडीवर’

WhatsApp Group Join Now

जमिनीची मोजणी पाहण्यासाठी आता आपल्याला हीच आवडी उपलब्ध होणार आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो , भूमी अभिलेख विभागाने यादी सातबारा उतारा डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिले होते. त्यानंतरच्या काळामध्ये तर व्हेरिफाइड असे डिजिटल सातबारा उतारे आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये मिळत आहे. आपल्याला सर्व शासकीय कामांसाठी उपयोगी पडत आहे तर आता भूमी अभिलेख विभागाने ही चावडी या डिजिटल स्वरूपामध्ये नोटीस बोर्डवर जमीन मोजणी संदर्भातील नोटीस उपलब्ध करून दिले आहे . यामुळे आपल्या शेतजमीन लगतच्या असलेल्या जमिनीची मोजणी कधी झाली आहे हे नागरिकांना आता सहजपणे कळणार आहे.

 

नेमकं चावडी म्हणजे काय ?

तलाठी कार्यालय यालाच आपण चावडी असेही म्हणतात. महसूल विभागाच्या महत्त्वाच्या नोटिसा प्रसिद्ध करण्यासाठी चावडीवर लावले जातात . त्यामुळे चावडी हा लोकप्रिय व विशेष महत्त्व असणारा भाग आहे . आता डिजिटल युग असल्यामुळे चावडीवर लोकांच्या प्रत्यक्ष पणे कमी कमी होत चालला . प्रसिद्ध झालेली नोटीस नागरिकांना पाहता येणे आता शक्य राहिले नाही . त्यामुळे चावडीवरील नोटीस ची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे . यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही ई-फेरफार प्रकल्पांतर्गत ही ई-चावडी हा एक नवीन डिजिटल नोटीस बोर्ड प्रसिद्ध केला आहे.

जमिनीचे वाद आता मिटणार फक्त एका क्लीकवर

जमीन मोजणीसाठी अनेक शेतकरी जमीन मालक भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्यावर प्रक्रिया सुरू होते . अर्ज सादर केल्यानंतर संबंधित जमीन लगतच्या शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृतपणे नोटीस पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येते . अनेक वेळा या नोटीसा उशिरा मिळतात किंवा वेळेवर मिळत नाही . यामुळे नोटीस घरी आल्याच नाही किंवा भूमी अभिलेख विभागाने नोटीस पाठवलीच नाही . अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात येतात . या आलेल्या तक्रारीच्या कारणावरून मोजणीवर शेतकऱ्यांकडून हरकती नोंदवण्यात येतात . यामुळे याचा परिणाम म्हणजे जमीन मोजणी लांबी व पडते . ज्या शेतकऱ्याने या संदर्भामध्ये अर्ज केला होता त्याचे जमीन मोजणी मागे राहते. ही चावडी मध्ये आता मोजणीची नोटीस प्रसिद्ध होत असल्यामुळे आता अशा तक्रारींना वाव मिळणार नाही असाही, दावा भूमी अभिलेख विभागाने केला आहे.

Also Read  Business Loan Schemes for Women महिला व्यवसायिकांना उद्योगिनी योजनेद्वारे महिलांना या व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज व 30 टक्के अनुदान सविस्तर माहिती जाणून घ्या

ई-चावडी‘ वर जमीन मोजणीची नोटीस कशी पहावी

डिजिटल नोटीस पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम महाभुमी या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईट ची लिंक खालील प्रमाणे आहे.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जमीन मोजणी हा पर्याय निवडावा लागेल.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

आपली चावडी यावर सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये माहिती पाहायला मिळणार आहे. आपल्याला जिल्हा तालुका आणि नंतर गाव निवडायचा आहे गाव निवडल्यानंतर आपल्याला मोजणी संदर्भात सर्व पर्याय दिसणार आहे कोणी मोजणी टाकली आहे किंवा कोणाचे कुठपर्यंत प्रोसेस आली पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment