नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवत असते . या योजनेच्या माध्यमातून शेती उत्पन्न वाढावे व शेतकऱ्यांना विविध कामे करण्यासाठी सुलभ जावे यासाठी शासन योजना आखत असते. आज आपण 50 टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्राविषयी माहिती पाहणार आहोत.
साधारणपणे शेतामध्ये पीक आल्यानंतर त्यावर विविध किडीचा प्रादुर्भाव हा होतच असतो. यासाठी शेतकऱ्यांना मग फवारणी करावी लागते फवारणी करण्यासाठी त्यांच्याकडे जर फवारणी यंत्र नसेल तर अशावेळी पिकाचे अतोनात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी 50 टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते . यामध्ये 50% अनुदान हे शासन देणार आहे व उर्वरित अनुदान हे शेतकऱ्यांनी स्वतः भरायचे आहे.
कोणकोणत्या यंत्रांचा समावेश होतो
साधारणपणे यामध्ये बॅटरी ऑपरेटर , सौरचलित फवारणी यंत्र, ट्रॅक्टर माउंट , ट्रॅक्टर ऑपरेटर या यंत्रांचा समावेश सुद्धा यामध्ये केलेला आहे.
लाभार्थी निवडीचे निकष
शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व आठ अ उतारा असणे.
शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जातीमध्ये असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार इत्यादी.
ऑनलाइन किती प्राप्त होणार
यामध्ये 50% अनुदान प्राप्त होणार असून ते 3000 पासून 1 लाख 25 हजार पर्यंत मिळणार
आवश्यक कागदपत्र
सातबारा आठ अ उतारा.
आधार कार्ड .
बँक पासबुक .
स्वयंघोषणापत्र.
मोबाईल नंबर .
पूर्वसंमती पत्र .
जातीचा दाखला (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती).