Digital Reshan Card कागदी रेशन कार्ड होणार आता इतिहास जमा प्रत्येकाला मिळणार ई-शिधापत्रिका
नमस्कार ,शेतकरी बंधूंना आणि भगिनींनो कागदी रेशन कार्ड च्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेत होतो . त्याचप्रमाणे कागदी रेशन कार्ड वर आपल्याला राशन सुद्धा उपलब्ध होत आहे. पूर्वीपासून कागदी रेशन कार्ड वर प्रामुख्याने वापर केला जात होता. मात्र आता ही कागदी रेशन कार्ड इतिहास जमा होणार असून नव्याने ही ई- रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे . त्यामुळे जुने कागदी रेशन कार्ड इतिहास जमा होणार आहे .Digital Reshan Card
आजही समाजातील गरीब आणि गरजू सर्वसामान्य लोकांना धान्य देण्यासाठी शासन शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड तयार करते. साधारणपणे रेशन कार्ड चे तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचे महत्त्व खुप आहे. त्याचप्रमाणे रेशन कार्ड हा एक अधिकृत पुरावा सुद्धा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यामुळे रेशन कार्ड चे महत्व अनन्य साधारण असेच आहे.Digital Reshan Card
शासनाचे कागदी शिधापत्रिकेचे माध्यमातून स्वस्त दुकानदार यांच्या माध्यमातून धान्याची परस्पर विल्हेवाट लावून ते गरजवंत व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. यामुळे गरिबांना धान्य उपलब्ध होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . ज्याला गरज आहे त्यालाच मात्र हे अन्न धान्य मिळत नाही . त्यामुळे त्यावर उपाय म्हणून ही रेशन कार्ड सुरू करण्याविषयी सुरुवात करण्यात येणार आहे.
ई रेशन कार्ड मध्ये आता बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात झाली आहे . ई-शिधापत्रिका ही डिजिटल रेशन कार्ड करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली केली आहे. यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागणार आहे . खरंच गरजवंत व्यक्ती पर्यत धान्य पोहोचण्यास खरंच मदत होणार आहे . हे डिजिटल शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी आपल्याला अन्न मंत्रालयाच्या ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.