new voter list download : नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभा निवडणूक 2024 याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या तारखा नुसार आपल्या मतदारसंघांमध्ये आपलं वोटिंग म्हणजे मतदान कधी आहे हे आपल्याला माहित झालेला आहे . आजच्या लेखाच्या माध्यमातून मतदार यादी मध्ये आपले नाव कसे शोधावे ? याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन ॲप new voter list download
भारतीय निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन ॲप हे नवीन ॲप मतदार यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेले आहे.
वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
मतदार यादीत आपले नाव कसे शोधावे ?
सुरुवातीला वोटर हेल्पलाइन ॲप आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.
चक्क बँक देत आहे , शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज फक्त ‘हे’ कार्ड काढा.
प्ले स्टोअर वरून एप्लीकेशन डाउनलोड झाल्यावर Voter Helpline Apps खालील प्रकारे आपल्याला पहावयास मिळेल.

Voter Helpline Apps
मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी पुढील सूचना वाचा .
- सुरुवातीला आपले यामध्ये नोंदणी करावे लागेल . नोंदणी करण्यासाठी New User या ठिकाणी क्लिक करावे .
- त्यानंतर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवण्यासाठी क्लिक करावे.
- ओटीपी आणि आपल्याला एक आपल्या लक्षात राहील असा एक पासवर्ड तयार करावा लागेल व तो पासवर्ड आपल्या लक्षात ठेवा लागेल.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला होम स्क्रीनवर परत यायचे आहे.
- आता आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि आपण तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपलं लॉगिन हे successfully होणार आहे.
- आपले लॉगिन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रकारे एक विंडो ओपन झालेली पाहावयास मिळेल.

नोंदणी झाल्यावर अशी स्क्रीन दिसेल.
- आता आपल्याला नावावरून search Your name in electrol Roll या आपल्या क्लिक करायचे आहे.
- खाली आलेल्या विंडो आपले राज्य निवडावे व मोबाईल क्रमांक टाकून एक OTP प्राप्त होईल . OTP टाकल्यावर आपले समोर आपलं नाव कोणत्या यादीत हे समजेल व आपण कुठे मतदान करायचे आहे याची माहिती प्राप्त होईल.
या ॲप मध्ये आपल्याला आणखी कोण कोणती माहिती प्राप्त होईल?)
- यामध्ये मतदार रजिस्ट्रेशन करू शकता.
- आपल्याला निवडणुकीसाठी कोणते उमेदवार उभे आहेत याची सुद्धा माहिती प्राप्त होणार आहे .
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले इलेक्ट्रॉनिक एपिक कार्ड सुद्धा म्हणजे आपले मतदान कार्ड यामध्ये डाउनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे .
- त्याचप्रमाणे निवडणूक संदर्भामध्ये काही तक्रारी असेल तर या ठिकाणी सुद्धा दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
- या ॲपच्या माध्यमातून निवडणूक संदर्भामध्ये आपल्याला बरेच सारे माहिती इथे प्राप्त होत आहे. new voter list download
माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा . धन्यवाद ! ! !