Lek ladki Yojana Maharashtra महाराष्ट्र शासन नियमित वेगवेगळ्या घटकांसाठी योजना करत असते महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्मदर वाढ होण्यासाठी लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने याबाबतीत घेतलेला आहे.
लेक लाडकी Lek ladki Yojana Maharashtra ही महत्वकांशी योजना महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली. 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना या योजनेच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येते. तर आज आपण लेक लाडकी या योजनेविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत . हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा व आवडल्यास आपल्या मित्रांना मैत्रिणींना नक्की पाठवा चला तर मग पाहूया माहिती.
PPF , NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर सावधान 31 मार्चपूर्वी करा ही काम तातडीने
या योजनेचा प्रमुख हेतू म्हणजे राज्यातील मुलींचा जन्मदर वाढू नये व मुलीच्या जन्माचे स्वागत करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोण कोणाला मिळतो? Lek ladki Yojana Maharashtra
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो . अशा रेशन कार्डधारकांच्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये अशा प्रकारे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ दिला जातो . साधारणतः जन्म झालेल्या पहिल्या किंवा दुसऱ्या मुलींना त्याचप्रमाणे पहिला मुलगा व एक मुलगी असल्यास या योजनेचा लाभ दिला जातो . पहिला आपत्याच्या वेळी तिसरा हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता व वडील यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक व अनिवार्य आहे. Lek ladki Yojana Maharashtra
अधिक माहिती व अर्ज कुठे कराल?
साधारणपणे या संदर्भामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल. तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला या संदर्भामध्ये अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना आपल्याला तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर व त्याची माहिती बँक खाते तपशील आणि योजना कोणत्या टप्प्यातील लाभासाठी म्हणजे पहिला अपत्य की दुसरा अपत्य ते आपल्याला तिथे तारीख ठिकाण टाकून सही करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज सादर करून त्या संदर्भातील पोस्ट सुद्धा घेऊ शकता. Lek ladki Yojana Maharashtra
आवश्यक कागदपत्रे?
- लाभार्थी जन्मदाखला
- कुटुंबातील उत्पन्नाचा दाखला (एक लाख च्या आत उत्पन्न हवे )
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड व प्रथम लाभार्थी
- पालकांचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड ( पिवळी किंवा केशरी )
- मतदान ओळखपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- दुसरा अपत्त्याच्या वेळेस कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
ही सर्व कागदपत्रानंतर अंगणवाडी सेविका हा फॉर्म ऑनलाइन पोर्टलवर भरेल व त्यानंतर तुमचा संबंधित अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी पुढे महिला व बालविकास कार्यालयाकडे पाठवायचा आहे. Lek ladki Yojana Maharashtra