7th Pay Commission : सातवा वेतन आयोग याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व राज्य कर्मचाऱ्यांसाठी फायदेमंद अपडेट घेऊन आलो आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे वर्षभरामध्ये दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढवला जातो व त्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना यातून महागाई भत्ता दिला जातो.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी सनापूर्वी एक महागाई भत्ता बाबत मोठी भेट मिळण्याची दाट शक्यता आहे होळी पूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा केंद्रातील मोदी सरकार करणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे म्हणजेच सध्या महागाई भत्ता हा 46 टक्के आहे तो 4 टक्के वाढल्यास महागाई भत्ता 50 टक्के होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेमध्ये वाढ झाल्यानंतर याचप्रमाणे महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांचा येथे काही महिन्यांमध्ये वाढवला जातो त्यांचाही महागाई भत्ता हा 46% वरून 50% होईल.