Agricultural Pipeline Subsidy l नमस्कार शेतकरी बंधूंना कृषी क्षेत्रामध्ये विकास हवा यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आणत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न वाढावे व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरावे हा यामागचा उद्देश असतो.
शेतीचा विचार केला असता जर शेतीमध्ये आपण सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केला तर त्याचे उत्पन्न वाढते. याकरिता देखील शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात असतात.
महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना शेततळे योजना या योजना राबवले जातात. त्याचप्रमाणे मागेल त्याला दीपक आणि तुषार सिंचन यासारख्या महत्त्वाकांशी सिंचनाच्या योजना सुद्धा राबवल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती पाहणार आहोत ते म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना Agricultural Pipeline Subsidy आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त होते.
पाईपलाईन अनुदान योजना (Agricultural Pipeline Subsidy )
महाराष्ट्र राज्य कडून शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला आता अर्ज करता येणार आहे . साधारणपणे योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे . या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी 50 ते 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे . हे अनुदान 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
पाईपलाईन अनुदान योजनेचा (Agricultural Pipeline Subsidy) लाभ कोणाला घेता येणार ?
या योजनेमध्ये या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारा उतारावर विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे किंवा त्यांच्या शेतामध्ये पाण्यासाठी इतर कोणत्याही सिंचन सुविधेची नोंद असली पाहिजे. सिंचन योजनेमध्ये शेततळे विहीर किंवा इतर सिंचन पद्धतीचा समावेश शेतकरी करू शकतो मात्र त्याची नोंद असणे आवश्यक आहे . अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरता अनुदान वितरित करता येणार आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये पाण्याचा उपलब्ध स्रोत किंवा सिंचनाचा स्रोत असणे अत्यंत आवश्यक आहे.
पाईपलाईन अनुदान योजनेचा अर्ज प्रक्रिया आणि अर्ज छाननी प्रक्रिया
पाईपलाईन अनुदान योजनेचा Agricultural Pipeline Subsidy लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. हा अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधूंना यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन त्या संदर्भात अर्ज करायचा आहे . महाडीबीटी च्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे व त्यानंतर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे
Land Record on Price | भू नकाशावर आता सातबारा रेडीरेकनर दर ही येणार
.
लॉटरी पद्धतीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्याच शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येते. त्या संबंधित शेतकऱ्याला तसा मेसेज मोबाईलवर प्राप्त होतो लॉटरी पद्धतीमध्ये शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ते कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे.
पाइपलाइन अनुदान घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज येथे करा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- सातबारा व आठ अ उतारा
- बँकेचे पासबुक
- आधार कार्ड
- आधार कार्ड
- बँकेसोबत लिंक असावे
- पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र