🧓 Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2025 – ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभदायक योजना
राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अपंगत्व, अशक्तपणा, दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होणे, चालताना त्रास होणे इत्यादी समस्या भेडसावत असतात. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक यावर उपचार घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2025 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे व आर्थिक मदत देण्याची योजना सुरु केली आहे.
📌 Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi म्हणजे काय?
मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ६५ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना चालताना त्रास होतो, ऐकू कमी येते, डोळ्यांनी दिसत नाही, अशक्तपणा आहे अशा लाभार्थ्यांना आवश्यक उपकरणे व साधने मोफत दिली जातात.
🎯 मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश
-
ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणे
-
अपंगत्व आणि अशक्तपणावर उपाय म्हणून मोफत उपकरणे देणे
-
मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करणे
-
राज्यातील सामाजिक न्याय आणि समावेश सुनिश्चित करणे
🛠️ या योजनेअंतर्गत मिळणारी साधने व उपकरणे
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi अंतर्गत खालील उपकरणे लाभार्थ्यांना दिली जातात:
-
चष्मा
-
श्रवणयंत्र
-
लंबर बेल्ट
-
फोल्डिंग वॉकर
-
कमोड खुर्ची
-
नि-ब्रेस
-
स्टिक व व्हील चेअर
-
सर्वाइकल कॉलर
घरबसल्या करा फक्त 2 मिनिटांत रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे
ही सर्व उपकरणे मोफत दिली जातात आणि यासाठी कोणताही खर्च नागरिकाला करावा लागत नाही.
वायोश्री योजनेचे फायदे – Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi अंतर्गत राज्यातील 65 वर्षांहून अधिक वयाचे जेष्ठ नागरिकांना सरकारकडून विविध प्रकारचे फायदे मिळतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना त्यांच्या रोजच्या जीवनातील अडचणी कमी करून, त्यांना थोडी का होईना पण स्वतंत्रता मिळवून देणे.
या योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
-
रु. 3000 पर्यंतचे आर्थिक सहाय्य
– या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना थेट रु. 3000 पर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. या रकमेमुळे त्यांना किराणा, औषधे, तपासण्या, आणि इतर दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळतो. -
मोफत सहाय्यभूत उपकरणे
– या योजनेत मोफत चष्मा, श्रवणयंत्र, लंबर बेल्ट, कमोड खुर्ची, फोल्डिंग वाकर, व्हीलचेअर यांसारखी साधने दिली जातात. हे साहित्य जेष्ठ नागरिकांच्या शारीरिक अडचणी कमी करण्यात मदत करते. -
आर्थिक स्वावलंबन
– “बुजते हुए को तिनके का सहारा” हे हिंदीतील वाक्य याठिकाणी अगदी योग्य ठरते. वयोवृद्ध व्यक्तींना छोट्या आर्थिक मदतीमुळे कोणावरही अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. -
कुटुंबावरील अवलंबन कमी होते
– अनेक वृद्ध आपल्या मुलांवर, नातवंडांवर अवलंबून असतात. पण Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi अंतर्गत मिळणाऱ्या लाभांमुळे ते स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतात. -
मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम
– जेव्हा कोणी जेष्ठ नागरिक स्वतःच्या गरजा पूर्ण करू लागतो, तेव्हा त्याचा आत्मसन्मान वाढतो, आणि मानसिक दृष्ट्या तो अधिक सशक्त राहतो. हे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
✅ पात्रता निकष (Eligibility Criteria)
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण असाव्यात:
-
महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
-
वय 31 डिसेंबर 2023 अखेर 65 वर्षे पूर्ण झालेले असावे
-
बीपीएल (Below Poverty Line) रेशन कार्ड आवश्यक
-
वार्षिक उत्पन्न ₹2 लाखांपेक्षा कमी असावे
-
मागील 3 वर्षांत सरकारकडून मोफत उपकरणे मिळाली नसावीत
-
आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र अनिवार्य
-
बँक खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक
-
उपकरण वापराच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र 30 दिवसांत अपलोड करणे आवश्यक
Mukhyamantri Vayoshri Yojana साठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
-
वयाचा पुरावा:
-
दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे पूर्ण झालेले असावे.
-
-
ओळखीचा पुरावा:
-
आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र (Voter ID).
-
-
वृध्दापकाळ निवृत्ती वेतनाचा पुरावा:
-
खालीलपैकी कुठलाही एक पुरावा आवश्यक:
-
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी असल्याचा पुरावा.
-
राज्य किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ मिळत असल्याचा पुरावा.
-
तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र.
-
-
-
बँक खातेविषयी माहिती:
-
राष्ट्रीयकृत बँकेतील आधार लिंक असलेले बचत खाते
-
त्याचे पासबुक झेरॉक्स.
-
-
छायाचित्रे:
-
पासपोर्ट साईझचे 2 फोटो.
-
-
उत्पन्नाचा पुरावा:
-
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र.
-
-
स्वयंघोषणापत्र:
-
लाभार्थीने मिळणारी रक्कम ठरवलेल्याच प्रयोजनासाठी वापरण्याचे वचन दिलेले स्वयंघोषणापत्र.
-
तसेच, मागील 3 वर्षांत राष्ट्रीय/केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा लाभ घेतलेला नाही, याची नोंद असलेले पत्र.
-
-
साहित्य खरेदीबाबत माहिती:
-
अर्जामध्ये खालीलपैकी कोणते साहित्य खरेदी करणार आहात, हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक:
-
चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ग्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.
-
-
💸 योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य
Mukhyamantri Vayoshri Yojana अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साधारणतः ₹3,000 पर्यंत उपकरणांची किंमत सरकारकडून भरली जाते. हे उपकरणे लाभार्थ्याला पूर्णपणे मोफत मिळतात.
📝 Mukhyamantri Vayoshri Yojana साठी अर्ज कसा करावा?
-
जवळच्या मनःस्वास्थ केंद्र किंवा आरोग्य विभाग येथे संपर्क साधावा
-
आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरावा
-
संबंधित प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे
-
उपकरण घेतल्यावर 30 दिवसात प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे
📢 मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा प्रसार व जनजागृती
सरकार विविध शिबिरांद्वारे आणि आरोग्य मोहीमेद्वारे या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे. सोशल मीडिया, ग्रामसभांमधील घोषणा आणि आरोग्य केंद्रांमार्फत योजनेचा प्रचार केला जातो.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज व घोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा .
🤝 आपण काय करू शकता?
जर तुमच्या आजूबाजूला 65 वर्षांवरील कोणी गरीब आणि गरजू व्यक्ती असेल तर त्यांना Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi बाबत माहिती द्या. त्यांना अर्ज करण्यात मदत करा. अशा छोट्या कृतीमुळे कोणा एका गरजू व्यक्तीचे जीवन सुखकर होऊ शकते.
🙋♂️ महत्त्वाची सूचना
-
योजनेचा गैरवापर टाळावा
-
खोटे दस्तऐवज सादर केल्यास शासकीय कारवाई होऊ शकते
-
अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि खरी द्यावी
🗣️ निष्कर्ष: Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi
राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्वाच्या काळात समस्या उद्भवतात. अशा वेळी सरकारने राबवलेली Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi ही अत्यंत उपयुक्त आणि गरजूंना मदत करणारी योजना आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.