सातारा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेती उपयोगी अवजारे योजनेसाठी अर्ज सुरू – १५ जून पर्यंत संधी krushi yantrikikaran yojana 2025

WhatsApp Group Join Now

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ‘ Krushi Yantrikikaran Yojana 2025 ’ अंतर्गत शेतीसाठी उपयोगी विविध अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १ मे २०२५ ते १५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

✅ अर्ज कुठे करायचा?

शेतकऱ्यांनी सातारा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून फॉर्म भरावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून विविध शेती उपयोगी अवजारे यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून १५ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्याच्या अधिकृत जिल्हा परिषद वेबसाईटवर (krushi yantrikikaran yojana 2025 ) लॉगिन करून त्यासंदर्भातील फॉर्म भरावा, अशी सूचना जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.

आजच्या लेखामध्ये आपण या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत, तसेच सातारा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात, याची देखील माहिती घेणार आहोत.

🧑‍🌾 Krushi Yantrikikaran Yojana 2025 अंतर्गत मिळणारी अवजारे:

  • २ एचपी विद्युतचलीत कडबाकुटी यंत्र (विद्युत मोटारीसह) पुरविणे
  • २ एचपी विद्युतचलीत कडबाकुटी यंत्र (विद्युत मोटारीसह) पुरविणे
  •  ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह
  • ५ किंवा ७.५ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच
  • ३ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच
  • ३ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच
  • कृषी यांत्रिकीकरण – पल्टी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ.
  • मधपेट्यांसाठी अनुदान देणे
  • पॉवर विडर अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana 2025 – सातारा जिल्हा शेतकऱ्यांसाठी अनुदानित शेती अवजारे | अर्ज अंतिम तारीख 15 जून

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सातारा जिल्हा परिषद अधिकृत वेबसाइट 

📑 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Krushi Yantrikikaran Yojana 2025 ):

  • तीन महिन्यांच्या आतील सातबारा व खातेउतारा,
  • आधारकार्ड सत्यप्रत,
  • रेशनकार्ड सत्यप्रत,
  • बैंक पासबुक राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँक,
  • छोटे कुटुंब प्रमाणपत्र
  • कडबाकुट्टी पशुधन विकास अधिकारी यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला
  • घरगुती विद्युत बिल
  • पाइप व विद्युत पंप संचासाठी सात बारावर विहीर नोंद नसेल तर पाणी परवाना जोडण्यास हरकत नाही व विद्युत बिल,
  • कृषी यांत्रिकीकरण, ओजारासाठी ट्रॅक्टर चे आरसीबुक सत्यप्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
Also Read  rte maharashtra admission 2024-25 आरटीई अंतर्गत राज्यभरात 9 लाखापेक्षा अधिक जागा

घरबसल्या करा फक्त 2 मिनिटांत रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे

📌 अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती:

  • अर्जाची अंतिम तारीख – १५ जून २०२५

  • अर्ज छाननी – पंचायत समिती स्तरावर होणार

  • पात्र अर्जदारांचे अर्जच अंतिमरित्या स्वीकृत होतील


तुमच्याकडे वरील कागदपत्रे पूर्ण असल्यास, वेळ वाया न घालवता ऑनलाईन अर्ज भरा आणि ‘Krushi Yantrikikaran Yojana 2025 ‘ चा लाभ मिळवा. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि आधुनिक शेतीसाठी मदतीचा हात ठरू शकते.

 

 

Leave a Comment