गॅस सिलेंडर दरवाढ: सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा! LGP Gas Price Hike 50 Rs
महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक जबर धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात थेट ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही नवी दरवाढ आज, म्हणजेच ७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. LGP Gas Price Hike 50 Rs
सध्या मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८०२ रुपये इतकी आहे. पण दरवाढ लागु झाल्यानंतर ग्राहकांना 852 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, ही दरवाढ प्रधानमंत्री उज्वला योजना लाभार्थींनाही लागू होणार आहे, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
बजेट बिघडणार, महागाई वाढणार!
घरगुती गॅस सिलेंडर महागल्यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. आधीच भाजीपाला, धान्य, दुधाचे दर चढे असताना आता स्वयंपाकासाठी लागणारा गॅससुद्धा महाग झाल्याने गृहिणींना आणि घर चालवणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
इंधन दरातही हालचाल
दुसरीकडे, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रत्येकी २ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, ग्राहकांना दरवाढीचा तातडीने फटका बसणार नसला, तरी भविष्यात याचे परिणाम दिसू शकतात.
गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा आलेख सातत्याने चढत चालला आहे. आता गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर आणखी ताण येणार आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा सामान्य जनतेचा संताप उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तुमच्या परिसरात घरगुती गॅस किती दर झाला आम्हाला नक्की कळवा .