नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो सातबारा उतारा हा जमिनी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. मृत शेतकरी याच्या नावावर सातबारा उताऱ्यावर वारसांच्या नोंदी नसतात. अशावेळी अनेक अडचणी समोर येतात जमीन नियमानुसार होणे आवश्यक असते याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महसूल विभागाने शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्यामध्ये सातबारा बाबतची ही मोहीम समाविष्ट केली आहे .सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम बुलढाणा जिल्ह्यात एक मार्चपासून राबविण्यात येत आहे.
वारस नोंदी बाबाचे निर्माण होणारे वाद Mahabhulekh v2.0
शेतकरी मृत झाल्यानंतर त्यांच्या वारसा मध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण होतात .यामध्ये वारसदारांची संख्या अधिक असल्यास त्यांच्यामध्ये सहमतीने वाटप न झाल्यास ती जमीन तशीच पडून राहते. परिणामी राज्यातील अशी हजारो हेक्टर जमीन पडून आहे.
सातबारा उतारा अद्यावत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने राबवलेल्या विविध योजनांचा लाभ सुद्धा वारसदारांना देता येत नाही.
नोंदणी बाबतची कार्यपद्धती अशी असेल.
शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना राबवते मात्र ती योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. मृत शेतकऱ्यांच्या वारसाचे नाव नियमानुसार सातबारा उतारावर लावण्यात येणार आहे त्याची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असणार आहे.
तलाठ्यांनी वृत्त खातेदारांची गाव निहाय यादी तयार करावी.
वारसा संबंधी आवश्यक असणारे विविध कागदपत्र तलाठी यांच्याकडे देण्यात यावी.( मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला, सर्व वारसांच्या वयांचा पुरावा, आधार कार्डांची साक्षांकित प्रत, वारसा बाबत विहित नमुन्यातील शपथपत्र स्वयंघोषणापत्र अर्जातील वारसांचा पत्ता मोबाईल यांच्या पुरावा सह तपशील)
तलाठ्यांनी चौकशी करून मंडला अधिकारांमार्फतवारचा ठराव ही फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करावा व वारसा फेरफार तयार करावा.
या प्रक्रियेनंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारसा फेरफारावर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा उतारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारा उताऱ्यावर नोंदवल्या जातील.
तालुका तहसीलदारांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांनी मुदतीत ही सर्व कार्यवाही करावी.
वारसा नोंद मोहिमे अंतर्गत वारस नोंदीसाठी अर्ज प्राण्यांनी मार्फतच दोन दोनच यावा आणि या सर्व मोहिमेचा कामाचा आढावा आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जाणार आहे.
त्यामुळे सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये ती इतर जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये लागू होईल.