Gay Gotha Yojana 2024
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाने गाय व म्हैस पालनासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुधन सांभाळण्यासाठी अत्याधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत नक्की होणार आहे. आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहत आहोत. Gay Gotha Yojana 2025
ग्राम समृद्धी योजना नेमकी काय आहे?Gay Gotha Yojana 2025
महाराष्ट्र राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 पासून शेतकऱ्यांना पशुधन तसेच गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देणे दृष्टीने ही योजना सुरू केली. या योजनेमध्ये शेळीपालन कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे या व्यवसायांना चालना देणे हा सुद्धा या योजनेचा मुख्य उद्देश होता.Gay Gotha Yojana 2025
या सरकार योजनेचा फायदा काय?
शेतकऱ्यांना पक्के व आधुनिक पद्धतीने गोठे बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य वाढेल व त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या राहणीमानामध्ये सुद्धा सुधारणा होईल . दूध व्यवसाय वाढीस मदत होईल गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः शेतकऱ्यांना खर्च करण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना गोठा Gay Gotha Yojana 2025 बांधण्यासाठी येणारा खर्च याचा आर्थिक बोजा कमी होईल.
योजनेचा अर्ज कुठे कराल?
शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत संबंधित आपल्या जवळील पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावे लागणार आहे .तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा कृषी संवर्धन विभागात माध्यमातून सुद्धा अर्ज करता येईल.
शरद पवार ग्राम समृध्दी योजना नवीन प्रस्ताव अर्ज PDF डाउनलोड करा.
योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील कागदपत्र द्यावे लागेल.
सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन असल्याचा पुरावा जागेची मालकी हक्काचे कागदपत्र Gay Gotha Yojana 2025
अनुदान किती प्राप्त होते
शेतकऱ्यांकडे दोन ते सहा जनावरांचा गोठा बांधकामासाठी एकूण 77 हजार 188 रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते.
सहा ते बारा जनावरे असलेला गोठा बांधण्यासाठी यामध्ये 1 लाख 54 हजार 356 रुपये अनुदान दिले जातात.
तेरा पेक्षा अधिक जनावरांसाठी 2 लाख 31 हजार 564 रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेसाठी पात्रता काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सातबारा उतारा म्हणजे तो शेतकरी असणे आवश्यक आहे . त्याच्याकडे पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा आणि सदर व्यक्ती ग्रामीण भागातील पशुपालक असावा.