mukhyamantri dev darshan yojana maharashtra ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज केला नसेल ,तर अर्ज करा ,समाज कल्याण विभागाचे आवाहन

WhatsApp Group Join Now

राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातीलसर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले ऑफलाईन अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत. mukhyamantri dev darshan yojana maharashtra 

योजना लाभ व स्वरूप

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेस शासनाकडून मान्यता देण्यात आली सदर योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एकावेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रूपये 30 हजार इतकी असून सदर खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.

योजनेसाठी पात्रता निकष

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • वय वर्षे 60 व त्यावरील व्यक्ती योजनेचा लाभ घेवू शकतात.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
  • कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि रूपये 2 लाख 50 हजार पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील.
  • कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशेन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा
  • चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे

Also Read  ladaki bahin yojana on vidhanshabha विधानसभा निवडणुकीत ठरली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ; रक्कम होणार आता डबल

योजना अपात्रता 

लाभार्थी प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावा जसे टि.बी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, करोनरी अपुरेपणा, करोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरो इत्यादी आजार नसावेत.
शासन निर्णयातील अपात्रतेचे इतर निकष

आवश्यक कागदपत्र

  • विहित नमुन्याती ऑफलाइन अर्ज
  • आधार कार्ड, रेशनकार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे/ केशरी रेशनकार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अटी व शर्तींचे पालन हमीपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे

योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण विभाग , सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा .

Leave a Comment