आपल्या सरकारने अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणलेल्या आहेत. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असतो . तसेच शेतकऱ्यांना सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांना चांगल्या प्रतीचे प्रोत्साहन देण्यासाठी ही आर्थिक मदत होण्यासाठी आपल्या सरकारकडून या योजना राबवल्या जातात. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आणि ही मदत अनुदानाच्या स्वरूपात दिली जाते आणि त्यांना सोयी सुविधा देखील पुरवल्या जाता.
सरकारचा माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईप टाकण्यासाठी अनुदान दिले जाते. आताही योजना नेमकी काय आहे आणि त्याच्या अनुदानाबद्दलची माहिती आपण आता पुढे बघूया.
पाईपलाईनसाठी किती रुपये अनुदान भेटते?
आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना PVC पाईपलाईनसाठी अनुदान घ्यायचे असेल ; तर या योजनेच्या माध्यमातून 35 रुपये प्रति मीटर या दराने शेतकऱ्यांना अनुदान हे दिले जाते . हे अनुदान त्यांना 500 मीटर पर्यंत मिळत असते . तसेच या योजनेतून त्यांना जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांचे अनुदान हे शेतकऱ्यांना भेटते.
अनुदानाच्या नियम आणि अटी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
- शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
- समजा शेतकरी हा दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्याला पाईपलाईन योजनेचा लाभ दिला जाणार.
- शेतकऱ्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत माध्यमातून हा एक खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळते आणि उरलेली रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागते.
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
अर्ज कोठे करावा लागणार
या अर्जासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे . या पोर्टल वर जाऊन तुम्ही application करू शकता , तसेच शेतकऱ्यांचे नाव जर आले तर यामध्ये त्यांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे धन्यवाद.