नमस्कार नुकत्याच माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने राबवलेली असताना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या सवलती सोबतच राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बाजारभावात 830 रुपयाने विकल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडर साठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेची तीनशे रुपयांचे सवलत दिली गेलेली आहे आणि आता यापुढे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडरची उर्वरित 530रुपये अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे. 14.2 kg gas cylinder free yojana
राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्राच्या पंतप्रधान उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना ही योजना लागू होणार आहे . तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा व त्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक अर्थसाह्य सोबतच आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर साठी पाचशे तीस रुपये हे थेट बँकेत जमा होणार आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे .तसेच एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल . सुरुवातीला सिलेंडर पूर्ण रक्कम देऊन खरेदी करावा लागणार आहे. आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम ही त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.