सध्या भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती सुरू असून यामध्ये भविष्यात जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या परिस्थितीत तोंड देण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. केंद्र शासनाने सर्व राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाने तीन महिन्यांचं रेशन उचलून ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
तीन महिन्यांचं रेशन एकाच वेळी दिली जाणार
राज्य शासनाने तीन महिन्यांचं रेशन हे एकाच वेळी दिले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने नियोजन करण्यास सुरुवात केलेली आहे . राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यामध्ये अंतोदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबाला दरमहा 25 किलो धान्यदिमाल दिला जातो .ज्यामध्ये 20 किलो हा तांदूळ सुरुवात आणि 15 किलो गहू स्वरूपात दिला जातो. प्राधान्य कुटुंब असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला यामध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे एकूण पाच किलो धान्य दिले जाते.
पुरवठा विभागांनी धान्य वितरण नियोजन
सध्या मे महिना म्हणजे उन्हाळा सुरू आहे. त्याचप्रमाणे मान्सून आगमनाची सुरुवात सुद्धा येत्या दोन आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा हवामान आणि संभाव्य पूर्ण परिस्थिती यानुसार धान्य वितरण आणि साठवणुकीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून धान्याचे वितरण आणि धान्यसाठा याविषयी पुरवठा विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केलेली आहे.
अटल बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे : संपूर्ण माहिती
जून महिन्याचे नियमित धान्य आणि जुलै ऑगस्ट या दोन महिन्याचे आगाऊ आगाऊ धान्य उचलण्याचे निर्देश दिलेले आहे. यासाठी 30 मे 2025 ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय गोदामामध्ये धान्य साठवणूक करणे व त्याचे वितरण लाभार्थ्यांपर्यंत तीन महिन्यांचं रेशन पोहच करणे . वाहतूक ठेकेदार यांना 20 दिवसात तीन महिन्याचे धान्य वाहतूक करण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची सुद्धा निर्देश दिलेले आहे. केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचना याचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेले आहे.
स्वस्त धान्य दुकाने दररोज सुरू राहणार
कमी कालावधीमध्ये जास्त काम करणे, कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. गोदामामध्ये धान्य पोहच झाल्यानंतर ते धान्य रेशन दुकानदारांना तातडीने व त्यानंतर रेशन दुकानातून लाभार्थ्यांना उपलब्ध करून देणे.रेशन दुकानदारांना दररोज दुकाने उघडी ठेवून लाभार्थ्यांना वेळेत तीन महिन्यांचं रेशन वाटप करण्याचे आदेश आहेत. लाभार्थ्यांना जून , जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्यांचं रेशन एकाच वेळी मिळेल, या संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुद्धा सूचना दिलेली आहे.